नारायणाच्या शिष्यवृत्ती परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या नारायणा इन्स्टिट्यूटने फाउंडेशनसह ११वी आणि १२वी बोर्डाच्या अभ्यासक्रमासह आयआयटी, जेईई, नीट वैद्यकीय बॅचेसच्या २ वर्षांच्या रेगुलर कोर्ससाठी प्रवेश व शिष्यवृत्ती चाचणीचे आयोजन केले होते. मराठवाडा, विदर्भ, खान्देश विभागातील शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून लेखी चाचणी दिली. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा ही विज्ञान, गणित इत्यादी विषयांवर आधारित होती. परीक्षेनंतर साई मंदिर परिसर, मनजीतनगर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नारायणा संस्थेचे संचालक डॉ. विशाल लदनिया यांनी मार्गदर्शन केले. 
संस्थेने पूर्ण केलेल्या अखिल भारतीय सामाईक अध्यापन वेळापत्रकासह नारायणाने घेतलेल्या शिक्षा प्रणाली आणि दर आठवड्याला घेण्यात येणारी सामाईक सराव चाचणी ज्याद्वारे अचूक शिक्षणासह योग्य मूल्यमापनाची सुविधा उपलब्ध आहे याबद्दल माहिती देण्यात आली. सोबतच परीक्षेनंतर सूक्ष्म विश्लेषणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे विषयनिहाय आणि युनिटनिहाय वर्णनाद्वारे विश्लेषण करण्यात मदत होते. डॉ. विशाल लदनीया यांनी १०वीच्या वर्गात भविष्यातील उपयुक्त नियोजनाबाबत आपले विचार व्यक्त केले आणि विद्यार्थीनी स्वतःच्या आवडीनुसार ध्येय निश्चित करण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त केले. यावेळी पूर्ण झालेल्या परीक्षेच्या निकालाच्या आधारे १० ते ९० टक्के शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. तसेच शिष्यवृत्तीसह ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन, अर्ली बर्ड ऑफर २४ मार्च पर्यंत देण्यात आली असून शिष्यवृत्ती ३१ मार्चपर्यंत वैध राहणार आहे, पालकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विशाल लदनिया यांनी केले आहे.
प्रा. प्रशांत शुक्ला यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर डी. आर. जाधव यानी आभार मानले. यावेळी डॉ. विशाल लदनिया, प्रशांत शुक्ला, ए. दिलीश्वर राव, अब्दुल हन्नान, डॉ. आलोक कुमार, एम. उपाध्याय, डॉ. संजय सिंग, सुनील झा, मुकेश भारती, संदीप मिश्रा, सुमन कुमार,  प्रदीप मिश्रा, अब्दुल वहाब, दीपेश वालेच्छा, संजीवकुमार पटेल, अरुणदत्ति इनामदार  आदी उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी डी.आर.जाधव, चलपती टेकाकेली, मोहम्मद हाफीज, राजेश पाटील, प्रकाश पाटील, जमील खान, सुधीरकुमार सिंग, प्रदीपकुमार मिश्रा, भक्ती देशपांडे, रोहित मस्के, ऋषिकेश मूले, रामेश्वर बकाले, परमेश्वर आगळे, अनिरुद्ध जाधव, सीमा साबळे, किरण खेत्रे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.